नाविन्यपूर्ण उपक्रम

१)माझा गाव माझं पाणी ही संकल्पना राबवून घरातील सांडपाणी अंगणात मुरण्यासाठी सार्वजनिक स्वरूपाचे ३५ मोठे शोषखड्डयांची निर्मिती करण्यात आली .

२)महात्मा गांधीजी राष्ट्रीय ग्रामीण योजना आणि ग्रामस्थ लोकसहभागाबाबत ७५ वैयक्तिक शोषखड्डे बांधण्यात आले.

३) उर्वरित कुटुंबानी आपल्या घरातील सांडपाणी वर परसबाग फुलवल्या.

4)घनकचरा व्यवस्थापन

ग्रामपंचायत मार्फत गावातील घन कचऱ्याचे उत्तम नियोजन केले असून गावातील सर्व कुटुंबियांना ओल्या व सुक्या कचऱ्यासाठी प्रत्येकी दोन डस्टबीन देण्यात आले आहे. ओला व सुका कचरा चे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती बचत गटाच्या माध्यमातून केली जाते. त्याचे उत्पन्न वर्षाला सुमारे पाच ते सहा लाख रुपये बचत गटांना फायदा होतो .सर्व शासकीय कार्यालयांना शाळा अंगणवाड्यांना डस्टबिन वाटप करण्यात आले आहे तसेच पर्यटकांसाठी समुद्रकिनारी कचऱ्यासाठी कचराकुंडी बसविण्यात आल्या  आहेत.

सुक्या कचऱ्यापासून कंपोस्ट खताची निर्मिती केली जाते .काच कचरा,इलेक्ट्रिक कचरा ,प्लॅस्टिक कचरा,लोखंडी कचरा इ.कचरा  एकत्रित करून ग्रामपंचायत मार्फत बांधलेल्या कचरा वर्गीकरण शेडमध्ये वर्गीकरण करून त्याची विक्री केली जाते.

गावामध्ये कुठे ही प्लॅस्टिक कचरा व इतर कोणताही कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकला जात नाही. तसेच गावात कुठेही डम्पिंग ग्राउंड आढळून येत नाही.